Share

केंद्र सरकार विरोधात नागपूरमध्ये काँग्रेसची भव्य पदयात्रा

Published On: 

नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताच नाना पटोले हे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. सुमारे अडीच महिन्यांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. काँग्रेससह विविध पक्षांनी व संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

दुसरीकडं, गेल्या काही दिवसांपासून इंधनांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केल्याचं समोर आलं आहे. यामुळे सामन्यांच्या खिशावर आर्थिक बोजा वाढत आहे. केंद्र सरकारला शेतकरी आंदोलन व महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज नागपूरमध्ये पद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही पद यात्रा पार पडत असून शेकडो कार्यकर्ते व मोठा जनसमुदाय या पदयात्रेत सहभागी झाला आहे. यासोबतच, मोदी सरकार लादत असलेले शेतकरीविरोधी काळे कृषी कायदे रद्द करावेत तसेच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी इंधन दरवाढ भाजप सरकारने मागे घ्यावी या मागणीसाठी भंडाऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये देखील नाना पटोले हे सहभागी झाले होते. दरम्यान, नाना पटोले हे आक्रमक नेते असून राज्यभरात काँग्रेसने देखील आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरु केल्याचं गेल्या काही दिवसांपासून स्पष्ट होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!