🕒 1 min read
बंगळूरू: IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे. ज्यात विशेषत: भारतीय खेळाडूंसाठी सर्व दहा संघांनी मोठमोठ्या बोली लावल्या. या वर्षीच्या दहा संघांच्या स्पर्धेसाठी अतिशय मनोरंजकरित्या ऑक्शनमध्ये सेट तयार केले होते. राजस्थान रॉयल्स गेले अनेक वर्ष संघ बदलत असतो. यंदा मेगा ऑक्शनचे निमित्त साधत त्यांनी पुन्हा नवीन संघ तयार केला आहे.
राजस्थान रॉयल्सने ऑक्शन आधी कर्णधार संजू सॅमसन आणि परदेशी खेळाडू जॉस बटलर या दोन कॅप्ड खेळाडूंना रिटेन केले होते. तर युवा खेळाडू यशस्वी जैस्वाललाही अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केले होते. त्यांच्याकडे मेगा ऑक्शनसाठी ६२ कोटी रुपयांची रक्कम होती. ज्यात त्यांनी काही चांगले खेळाडू खरेदी केले तर काही मोठे खेळाडू गमावले आहेत. त्यांनी ट्रेंट बोल्ट , युझवेंद्र चहल आणि आर अश्विन सारखे मोठे खेळाडू खरेदी केले. तर जोफ्रा आर्चर सारख्या गोलंदाजाला पुन्हा संघात आणण्यास ते असमर्थ राहिले आहेत.
हल्ला बोल करण्यासाठी राजस्थानचे रॉयल्स पुढीलप्रमाणे: संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅककॉय, अनुनय सिंग, डेव्हिड मिलर
महत्वाच्या बातम्या
- सागर बंगल्यावर आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेसचा ताफा पोलिसांनी अडवला; कार्यकर्त्यांची धरपकड
- IPL AUCTION 2022: आगामी हंगामासाठी ‘या’ संघासह होणार हैद्राबादचा सनराईस
- “गजवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणाऱ्यांचे…”, योगी आदित्यनाथांचे मोठे वक्तव्य
- IPL AUCTION 2022: बँगलोरचा ‘रॉयल’ संघ प्रतिस्पर्धीना चॅलेंज देणार
- “काही दिवसांत भाजपचे साडे तीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील”, संजय राऊतांचा मोठा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
