Share

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chhatrapati) मराठा आरक्षणासंदर्भात मागील काही महिन्यांपासून मराठा समाजातील अनेक दिग्गजांच्या भेटी घेत होते. त्यापूर्वी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन देखील केले होते. दरम्यान, याचविषयी आज(१४ फेब्रु.)मोठा खुलासा करणार असल्याचे संभाजीराजे यांनी ट्विटकरुन सांगितले होते. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याची घोषणा आज संभाजीराजेंनी केली आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले की,‘२००७ पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असे नाही. ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झाले. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याची’, असे संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, ‘मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करुन मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे. याबाबत उद्या १४ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ती स्पष्ट करणार आहे’, असे संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!