🕒 1 min read
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियांसह शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणावर देखील टाच आली आहे. त्यातच काल तब्बल १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती करण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मराठा आरक्षणासाठीच्या जागा या भरती प्रक्रियेअंतर्गत भरता येणार नाहीत. त्यामुळे मराठा समाजातील अनेक युवकांना याचा फटका बसणार असून सामान्य पदांच्या जागांतूनच सामोरे जावे लागणार आहे. काहीच दिवसांपूर्वी न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असतानाच या पोलीस पदांच्या महाभरतीची आता लगबग का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली नाराजी!
या वतावरणात भरतीची घोषणा ऐकून दुःखी झाल्याचं त्यांनी सांगितलं. ५८ मोर्चाना सर्वच समाजाचा पाठींबा मिळाला होता. मात्र आता मराठा समाज व्यथित असताना आरक्षण स्थिर करण्याऐवजी अशी घोषणा करणे म्हणजे मराठा समाजाला एक प्रकारे चेतावणी दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही भरती पुढच्या टप्प्यात देखील घेतली जाऊ शकते, तर आत्ताच घ्या घ्यायची आहे? असा सवाल देखील राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे.
पोलीस भरतीची घोषणा
राज्यात आता सर्वात मोठी पोलीस भरती होणार आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे. कााालल महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक पार पडली आहे. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१९ साली जााहीर करण्यात आलेल्या ५२९७ पदांची भरती ४ मे २०२० रोजी रद्द करण्यात आली होती. तर, दुसऱ्या टप्प्यातील चालू वर्षात ६७२६ पदे भरायची आहेत. त्यामुळे या दोन्ही टप्प्यातील भरतीस शासन निर्णयातून सूट देत १२ हजार ५०० पदांची पोलीस भरती केली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवकांसमोर भविष्बायाबाबत अस्थिरता निर्माण झाली होती. आता राज्य सरकारने साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाईल असा निर्णय घेतल्याने भविष्यबाबतचा काळोख दूर झाला असला तरी मराठा समाजातील युवकांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कंगनाची वाचा घसरली, उर्मिला मातोंडकरला म्हणाली अश्लील चित्रपटात…
- …आणि संघाच्या केशव भवनमध्ये झाडू मारणारा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला !
- मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिन – जालना मध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
- सरकारने निर्यातबंदी मागे घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरु- युक्रांद
- मराठा आरक्षणाला स्थगिती नंतर राज्यात होणार सर्वात मोठी पोलीस भरती…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
