Share

फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी होणार, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगलाअसताना आता ‘फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात येणार’, अशी घोषणा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार दणका दिला आहे. अर्थसंकल्पयीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवसाची सुरूवात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या खडाजंगीने सुरुवात झाली.

‘फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्षारोपण करण्यात आले होते. राज्यात वर्ष 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेरीस त्यातील 75.63% रोपे म्हणजे २१ कोटी जिवंत आहेत,त्याची देखभाल करण्यात येत आहे. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा ,शैक्षणिक संस्था,उद्योगसमूह ,खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबाबण्यात आली होती. ही मोहिम राबवण्यासाठी २०१६-१७ते २०१९-२० दरम्यान २४२९.७८ कोटी निधी मिळाला होता तो पूर्व वापरण्यात आला. २५ टक्के रोपं जिवंत का राहिली नाही याची चौकशी केली जाईल, अशी मागणी मंत्री दत्ताराय भारणे यांनी केली. त्यानंतर या प्रकरणाची विधिमंडळाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!