औरंगाबाद : शहरातील उस्मानपुरा भागातील प्रतापनगर परिसारातील मोकळ्या मैदानात चोरीची दुचाकी विकण्यासाठी एक दुचाकीचोर येणार आहे अशी माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार उस्मानपुरा पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. यांनतर शुक्रवारी सकाळी तो चोर प्रतापनगर येथील ग्राऊंडमध्ये चोरीची मोटरसायतकल विकायला आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आकाश जनार्दन काळे असे या आरोपीचे नाव आहे. यात जागेवर आकाशकडून स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच २० एएम ८७२४) जप्त केली. त्याती चौकशी केली असता अडीच महिन्यांपूर्वी उस्मानपुरा भागातून त्याने ही गाडी चोरल्याचे कबूल केले. पोलिस कोठडीदरम्यान त्याने पैठण भागातून चोरलेली हीरो होंडा प्रो आणि पुण्यातील कोथरूड येथून सीडी डीलक्स ही मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.
शहरात लॉकडाउन काळानंतर दुचाकीचोरीचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. या पार्श्वभुमिवर उस्मानपुरा पोलिसांनी कारवाई करत आरोप आकाशकडून पोलिसांनी तीन दुचाकी जप्त केल्या आहे. सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळोखे, निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण बाघ, लांडे पाटील, साहेबराव चव्हाण, अशरफ सय्यद, ज्ञानेश्वर कोळी, जयेश साळुंखे, संदिपान धर्मे, शशिकांत कंचार, मनोज बनसोडे, सतीश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महत्वाच्या बातम्या
- क्यूआर कोड स्कॅन करताय? थांबा आधी हे वाचा
- संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवता मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का?
- काँग्रेसने आणीबाणी लागू करणे ही ‘चूक’ होती – राहुल गांधी
- वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी पाठवलाच नाही?
- ‘बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीचे नाव घेताना डीसीपी बायकोचं नाव घ्यायचं असल्याप्रमाणे लाजत होते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

