Share

शेतकरी नुकसान भरपाई मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आमदार यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, आधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि नंतर संजय राठोड यांचं प्रकरण थांबत नाही तोच आता भाजप महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे. आघाडीच्या एका आमदाराच्या डीएनए टेस्टची मागणी आज विधानपरिषदेत करणार असल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा आमदार कोण? याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!