Share

महाराष्ट्रात काँग्रेस आगामी काळात एक नंबरचा पक्ष बनवणार; नाना पटोलेंची डरकाळी !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? हा प्रश्न अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. परंतु आज या संपूर्ण चर्चेवर पूर्णविराम लागलेला आहे. कालच नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता. यानंतर त्याचं नाव प्रदेशाध्यक्ष पदी निश्चित झाल्याच समजत होत. परंतु याची अधिकृत घोषणा काल केलेली नव्हती.

आज दुपारी नाना पटोले यांची कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. काँग्रेसनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पुढील प्रदेशाध्यक्ष हे अधिक आक्रमक असावेत यासाठी काँग्रेसच्या कमिटीचा आग्रह असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संविधानाच्या चाकोरीत राहून राज्यात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनविणार’, असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला आहे.

‘कांग्रेस प्रभारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विचाराने काम करणार आहे. मी विधानसभेतही संविधानाच्या चाकोरीत राहून काम केले. आता पक्षाच्या चाकोरीत राहून लोकशाहीच्या मार्गाने राहुन जनतेला न्याय देऊन देईल, महाराष्ट्रात काँग्रेस आगामी काळात एक नंबरचा पक्ष बनवणार’, असा निर्धार नाना पाटोळे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!