मुंबई : भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा ओबीसी विरोधी पक्ष आहे. भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फार्स होता का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझं वाक्य तोडून मोडून दाखवलं. मी काही चुकीचं बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणं हे काम आहे. कार्यकर्त्याचं गाऱ्हाणं ऐकणं माझं काम आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीदेखील तेच सांगितलं. पण मला विरोध का होतोय माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं आहे.
दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढवणाऱ्या भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची समिती नेमली होती. या समितीचा अहवाल जून २०१७ मध्येच फडणवीसांकडे सादर करण्यात आला होता. मात्र आता झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाना पटोले यांच्या विधानाची मोडतोड करून गैसरमज पसरवण्याचा प्रयत्न; कॉंग्रेसची सारवासारव
- प्रताप सरनाईकांचा दावा ठरतोय खरा, काँग्रेस-राष्ट्रवादीचं शिवसेना पोखरतायत ?
- ‘लसीकरण चार दिवस बंद तरी रेकॉर्ड केल्याचा दावा ; हा तर पोरखेळ’
- करीना-सैफच्या मुलांवरून केआरकेने केली भविष्यावाणी, म्हणाला…
- यामी गौतमचा नवा सिनेमा ‘लॉस्ट’, लग्नानंतर पहिलाच चित्रपट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

