Share

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र अव्हाडांनी दिला कॉंग्रेसला मोलाचा सल्ला

Published On: 

ठाणे: राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढल्यामुळे महाविकासआघाडीला काहीसा फटका बसला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काँग्रेसला राजकीय सल्ला दिला आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल पाहता महाविकास आघाडी झाली पाहिजे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीतही नगरपंचायत निकालासंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असला तरी महाविकासआघाडीचे एकत्र संख्याबळ जास्त आहे. त्यादृष्टीने भविष्यात कशाप्रकारे निवडणुका लढवायच्या याविषयीच्या रणनीतीसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले, राज्यात नुकत्याच पार नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल पाहता महाविकासआघाडी झालीच पाहिजे, असे मी नेहमीच सांगत होतो. लोकांना जे वाटायचे असेल ते वाटू द्या. राजकीयदृष्ट्या विचार केला तर, कार्यकर्त्यांचे मनोमिलन आज केले नाही तर पुढील काळात ते अवघड जाईल. हा धोक्याचा इशारा सर्वांना आहे. महापालिका नजरेसमोर ठेवून पुढील १० वर्षांचे राजकारण केले जाणार असेल तर ते चुकीचे ठरेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!