मुंबई : टेलिव्हिजनवरील अभिनेता शाहीर शेखचे (Actor Shahir Sheikh) वडिल शाहनवाझ शेख (father Shahnawaz Sheikh) यांचं निधन (passed away) झालं आहे. शाहीरनं काही दिवासांपूर्वीच ट्विटरवरून त्याच्या वडिलांना कोरोनामुळे (corona infection) गंभीर इन्फेक्शन झाल्याची माहिती दिली होती. त्यांची प्रकृती गंभीर होती त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
शाहीरच्या वडिलांचं बुधवारी रात्री निधन झालं. शाहीरचा जवळचा मित्र आणि अभिनेता अली गोनीनं (tweet of Ali Goni) ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. शाहीरला आपल्या ट्वीटमध्ये टॅग करत अलीनं लिहिलं, ‘अल्लाह तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती देवो’ अली गोनीच्या या ट्वीटनंतर शाहीरचे चाहते देखील शाहीरचं सांत्वन करताना दिसत आहेत. त्याच्या वडिलांसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.
दरम्यान १८ जानेवारीला रात्री शाहीरनं एक ट्वीट केलं होतं ज्यात त्यानं लिहिलं होतं, ‘माझे वडील व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना करोनामुळे गंभीर इन्फेक्शन झालं आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा.’ चाहत्यांना विनंती केली होती.
Inna Lillahi wa inna ilayhi raji'un ???????? May Allah rest uncle’s soul in peace bhai @Shaheer_S stay strong bhai ❤️
— Aly Goni (@AlyGoni) January 19, 2022
शाहीर शेखच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्यानं अर्जुनची भूमिका साकारली होती. ज्याचं बरंच कौतुक झालं होतं. तो शेवटचा ‘पवित्र रिश्ता’मध्ये मानवची भूमिका साकारताना दिसला होता.
महत्वाच्या बातम्या
- “वैचारिक मतभेद असले तरी…”; राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी केले मनसेच्या उमेदवाराचे अभिनंदन
- रजनीकांतला वाचवायचे होते ऐश्वर्या-धनुषचे नाते, मात्र…
- अपहरण झालेला स्वर्णव नेमका सापडला कसा? वाचा सविस्तर
- शिवसेना भाजपमध्ये छुपी युती होती म्हणून…; पराभवानंतर एकनाथ खडसेंचा आरोप
- भाजपच्या १२ आमदारांना निलंबित प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र; म्हणाले, ‘हे तर तर्कहीन’…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

