Share

राज्यातल्या तसेच मुंबईतल्या शाळा सुरू होणार ‘या’ तारखेपासून

Published On: 

मुंबई: राज्यात कोरोना (Corona) गेल्या काही महिन्यांपासून वाढत असल्याने राज्यसरकारने कडक निर्बंध लावले होते. या पार्श्वभूमीवर शाळा तसेच महाविद्यालये देखील बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र बुधवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला मुकले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हलचाली सुरू केल्या गेल्या आहेत. याबाबत वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं २४ जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु (Schools Re-opening) करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. मुंबईतील शाळा या २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत, तर राज्यातल्या शाळा या २४ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!