🕒 1 min read
मुंबई : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरने . “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” अशी प्रतिक्रिया सचिनने दिली होती.सचिनच्या या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.
सचिनच्या या ट्विटनंतर ज्या सचिनच्या खेळावर समस्त देशावासियांनी भरभरुन प्रेम केलं त्याच सचिनने शेतकऱ्यांविरोधात उद्गार काढले, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झाली. त्यानंतर, सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलंय. विशेष म्हणजे केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील सचिनचा निषेध नोंदवला. या कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या ऑईलने अंघोळ घालून सचिनच्या ट्विटचा निषेध नोंदवला. केरळमधील कोची येथे हा प्रकार घडला.
या घटनेचे पडसात महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात उमटायला लागले आहेत. यावरून राज्यातील भाजप नेते शिवसेना व कॉंग्रेसवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. ‘देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने पॉप डान्स केला. तर या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात’ असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी शिवसेना व कॉंग्रेसवर टीकास्त्र डागले आहे.
देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने "पॉप डान्स" केला.
तर या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात.
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 6, 2021
महत्वाच्या बातम्या
- दावा तर मुख्यमंत्री पदावर देखील करता येऊ शकतो, भुजबळांचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला
- ‘ड्रग्ज अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?’
- दानशूर कर्णाची उपमा देणे योग्य राहील असं कुणी विचारलं तर त्याचे उत्तर असेल फक्त रतन टाटा
- विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीने जिंकल जो रूटचही मन; अनेकांना झाली धोनीची आठवण
- ‘काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
