Share

विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीने जिंकल जो रूटचही मन; अनेकांना झाली धोनीची आठवण

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळाला 6 फेब्रुवारी सुरुवात झाली आहे. कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक्स ही जोडी खेळत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

यादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवून रूटला केलेल्या मदतीमुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले. आता स्वत: रूटनेही विराटवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना रूट म्हणाला की, ‘माझ्या पायात थोडा क्रॅम्प आला होता. त्यामुळे मला वेदना होत होत्या. यावेळी लगेचच विराट माझ्याजवळ आला आणि त्याने माझी मदत केली. तो खूप दयाळू आहे. त्याने खूपच चांगली खिलाडूवृत्ती दाखवली. आपण सर्वजण त्याच्याकडून याच गोष्टीची अपेक्षा करतो.’

इंग्लंडचा कर्णधार शतक झळकावल्यावर देखील अतिशय आत्मविश्वासाने खेळत होता. अशात ८७व्या षटकाला आर अश्विन गोलंदाजी करत असताना रूटने शेवटच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचला. मात्र त्यानंतर नॉन-स्ट्रायकर एंडकडे येत असताना त्याला पायात वेदना झाली आणि तो जमिनीवर पडला.

त्यावेळी सामना थांबवण्यात आला आणि इंग्लंडचे फिजिओ मैदानात आले. मात्र फिजिओ येण्याआधी विराटच रूटच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले. विराटने रूटचे पाय स्ट्रेच करत त्याची वेदना कमी करण्यासाठी मदत केली.

भारतीय कर्णधाराने दाखवलेली ही खिलाडूवृत्ती पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले. तसेच ही घटना पाहून अनेकांना माजी कर्णधार एमएस धोनीची आठवण झाली. धोनीने काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला देखील अशीच मदत केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!