Share

Bharat Jodo Yatra | काँग्रेस सेवादलाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचा भारत जोडो यात्रेत निधन

Published On: 

Bharat Jodo Yatra | मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात पार पडत आहे. सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये ही यात्रा दाखल झाली. सकाळी सहा वाजता पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली होती. मात्र, अटकळ येथे यात्रा पोहोचताच सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. कृष्णकुमार पांडे (Krishna Kumar Pandey) नागपूर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यात्रेचे नियोजन केले आहे. मात्र, यात्रेचा आजचा दुसराच दिवस असताना मोठी घटना घडली आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला आजचा दुसराच दिवस आहे. यात्रा चार दिवस नांदेड जिल्ह्यात आहे.

भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन कृष्ण कुमार पांडे यांनी केलं. यावेळी त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले.

देगलुर मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन झालं. यानंतर देगलूर नगर परिषदेतर्फे सत्कार झाला. तसेच यात्रेसाठी संपूर्ण तयारी झाली आहे. यात्रेला सर्व स्तरातून वाढता प्रतिसाद देखील मिळत आहे. राहुल गांधी हे नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी मुक्काम करणार आहेत. रोज ज्या ठिकाणी मुक्काम आहे तिथे सभा आणि कॉर्नर मीटिंग होईल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!