Share

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आता थकलेत, सुशीलकुमार शिंदेंनी दिले विलिनीकरणाचे संकेत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होणार असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच आईची लेकरं आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर आम्ही दोन्ही पक्ष खेळलो आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही एकत्र येऊ असं सूचक विधान केल्याने दोनही पक्षातील वरिष्ठ नेते याविषयी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एक होणार अशी अफवा पसरली होती. परंतु यातून काहीच तथ्य समोर आले नव्हते. त्यामुळे आता शिंदे यांच्या विधानाने खरच एकत्र येतील की हीसुद्धा अफवाचं ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शरद पवार हे यापूर्वी कॉंग्रेसमध्येचं होते. १९९९ ला त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर कॉंग्रेससोबत आघाडी करत केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी ही कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181522059257532416?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181521100359884801?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181520898798448643?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!