नांदेड : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमधील देगलूर येथे काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र असून रावसाहेब यांचे कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर या मतदारसंघात काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता काँग्रेसने अंतापूरकर यांच्याच कुटुंबात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकीत आज जितेश यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील ३० विधानसभा आणि तीन लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या ३० ऑक्टो.ला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ नोव्हें.ला या जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये चार, आसाममध्ये पाच, मेघालय, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी तीन जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तर राजस्थान, बिहार आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन आणि मिझोराम, तेलंगना, नागालँड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मिरज दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- मुंबईतही होणार शाळा सुरु; महापालिका आयुक्तांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा
- आयपीएलमध्ये फक्त पन्नास रुपये गुंतवून सलूनवाला रातोरात झाला करोडपती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

