टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाला दिमाखात सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील डॉल्बीवरून वाद निर्माण होताना दिसत आहे. गणेश भक्तांकडून डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी केली जातेय तर प्रशासन मात्र बंदीवर कायम आहे. मागील वर्षी याच मुद्यावरून खा उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील आमने सामने आले होते.
उदयनराजे यांनी यावेळीही जाहीरपणे डॉल्बी लावण्याचे समर्थक केले आहे. तरुणाईचा उत्साह वाढवायचा असेल तर डॉल्बी गरजेचा आहे. काही लोक डॉल्बीमुळे इमारती पडल्याचं सांगतात, असं असत तर सर्जिकल स्ट्राईकसाठी विमानांऐवजी डॉल्बीच वाजवले असते, असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, भाजप नेते देखील त्यांच्या प्रवेशासाठी आग्रही आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाचा समाचार घेताना कोणी मला खो देण्याचा प्रयत्न केला, तर मी स्वतःच खो घालेन, त्यामुळे कोणीही त्या विचारात राहू नये, अशी टीका खा उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्याच्या मुलीचा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकेल
‘भाजपमध्ये मेगाभरती नाही, ठराविक नेत्यांनाचं प्रवेश दिला जातोय’
कॉंग्रेसमध्ये आश्वासनं पाळली जात नाहीत : पवार
त्या काळात होणारी पोटदुखी टाळण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय


