Share

महिला उमेदवाराला कॉंग्रेस नेता म्हणाला ‘माल’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभेच्या प्रचारात महिला नेत्यांबद्दल अश्लील शेरेबाजी केल्याचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशमधील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारवेळी काँग्रेसचे उमेदवार माजी विरोधी पक्ष नेते अजय सिंह यांनी भाजपाच्या महिला खासदाराबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे.

भाजपा उमेदवार आणि विद्यमान खासदार रीती पाठक यांच्याबद्दल बोलताना सिंह यांनी सभ्येतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. गेल्या निवडणुकीत भाजपाने तिकीट दिले. त्यावेळी, मोदींची लाट होती, सर्वजण १५ लाख रुपयांच्या चक्करमध्ये मोदींच्या पाठीशी राहिले. मात्र, खासदार झाल्यानंतर रीती पाठक आपल्या लोकांमध्ये फिरकल्याच नाहीत, यापुढेही येणार नाहीत. आपल्या खासदार निधीतूनही त्यांनी कुठलेही काम केलं नाही. तुम्हीच सर्वांनी त्यांचा अनुभव घेतलाय, की भैय्या वो ठीक माल नही, असे म्हणत सिंह यांनी रीती पाठक यांना चक्क माल असे संबोधले आहे.

अजयसिंह यांचा हा वादग्रस्त व्हीडिओ सोशल मीडियीवर व्हायरल होत आहे. तसेच सिंग यांच्यावर आता चौफेर टीका होऊ लागली आहे.दरम्यान,महाराष्ट्रात देखील कॉंग्रेस नेत्यांनी बलात्कार पीडित मुलींबाबत केलेल्या बेलगाम वक्तव्यामुळे सामाजिक स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी ‘पॉस्कोअंतर्गत सरकारकडून मिळणाऱ्या पैशांसाठी आदिवासी मुली बलात्कार झाल्याची तक्रार देण्यासाठी पुढे येतात’ असे बेलगाम वक्तव्य केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!