Share

“हिटलर की मौत मरेगा मोदी” ; सत्याग्रह मंचावरुन काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : अग्निपथ योजना आणि राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीवरून संतप्त झालेले काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी जंतर-मंतरवरील ‘सत्याग्रहा’च्या मंचावरून पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. झारखंडमधून आलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने त्यांची हिटलरशी तुलना करून मर्यादा ओलांडली. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी हिटलरच्या मार्गावर चालले आहेत आणि हिटलरसारखा त्यांचा मृत्यू होईल. सुबोध कांत यांनी ही टीका केली तेव्हा काँग्रेसचे अनेक बडे नेते मंचावर उपस्थित होते आणि वादग्रस्त वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाटही झाला.

अग्निपथ योजनेवर सुबोधकांत सहाय म्हणाले, “मला वाटते की यांनी हिटलरचा सर्व इतिहास ओलांडला आहे. हिटलरनेही खाकी नावाची अशी संघटना तयार केली होती, त्याने ती लष्करात तयार केली होती. मोदींनी हिटलरचा मार्ग अवलंबला तर ते हिटलरसारखे मरतील, हे मोदींनी लक्षात ठेवावे.”

काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना सहाय यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहाय यांनी पंतप्रधानांविरोधात असंसदीय भाषा वापरली. अग्निपथ वादात काँग्रेसने जर्मनीचा नाझी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचा उल्लेख करून शब्दयुद्ध अधिक तीव्र केले आहे. सहाय यांच्या या वक्तव्यावरुन गदारोळ झाला आहे. त्यावर जोरदार टीका करत भाजप नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह आणि असंसदीय वक्तव्य केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीच त्यांच्या नेत्यांना, अशी अपमानास्पद टिप्पणी करण्यास प्रवृत्त केल्याचे पूनावाला म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!