नागपूर : शिवसेना , राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी उदयास येत सरकार चालवत असताना तिन्ही पक्षातील मतभेद मात्र काही केल्याने मिटताना दिसत नाहीत. आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शिवसेनेचे पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला होता. मात्र मोठ्या वादंगानंतर ते नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले त्यांनतर आता राष्ट्रवादीने विदर्भातील कॉंग्रेसचा बडा नेता गळाला लावला आहे. विशेष म्हणजे हा नेता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा कट्टर समर्थक आहे.
काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कट्टर समर्थक प्रशांत पवार आज (16 ऑगस्ट) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. प्रशांत पवार ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशांत पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. प्रशांत पवार मुळचे भंडारा जिल्ह्यातील आहेत. या पक्षप्रवेशामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे डॉक्टरांचा अपमान – भाजप
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यात एकत्रित येऊन महाविकासआघाडी स्थापन केली आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार काम करत आहेत. मात्र मित्रपक्षातील नेत्यांना पक्ष प्रवेश दिल्यावरुन याआधीही आघाडीत तणाव निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्याचा राष्ट्रवादीत होणार हा प्रवेश राज्याच्या राजकारणावर काय परिणाम करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोरोनाच्या काळात आंदोलनं करताना लाज वाटायला पाहिजे – हसन मुश्रीफ


