Share

संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे डॉक्टरांचा अपमान – भाजप

Published On: 

मुंबई : डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं, असं वक्तव्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं होतं. या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली असून, संजय राऊतांवर भाजपनं टीकाही केलीय.

‘कोरोनाच्या संकटात डॉक्टर देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी असं विधान करणं म्हणजे डॉक्टरांचा मोठा अपमान आहे. त्यामुळे संजय राऊतांनी राज्यासह देशातील सर्व डॉक्टरांची माफी मागावी,’ अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.

कोरोनाच्या काळात आंदोलनं करताना लाज वाटायला पाहिजे – हसन मुश्रीफ

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की, ‘WHO ला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नही. कंपाऊंडरकडून घेतो. कारण त्यांना जास्त कळतं.’

संजय राऊत यांच्या या विधानावरूनच आता वादाला सुरुवात झालीय. भाजपनं माफीची मागणी केली असली तरी डॉक्टरांच्या कुठल्याच संघटनेकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आली नाहीय.

आज देशात मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे का ? – सोनिया गांधी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!