Share

आशिष शेलार पाठोपाठ आता कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात राजकीय नेतेमंडळींना धमकीचं सत्र सुरुच आहे. भाजप नेते आशिष शेलार यांना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच परवाच्या दिवशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर तातडीने आशिष शेलार यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर आता शेलार यांना धमकी देणाऱ्याला मुंबईच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना जीवे मारण्याच्या धमकी नंतर आता कॉंग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना देखील जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत चंद्रकांत हंडोरे यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे निलेश नानचे असं हंडोरे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिस आता त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

हंडोरे यांना त्यांच्या पक्षातील माणसांवरच विश्वास नसल्याचे दिसत आहे. कारण काँग्रेस (Congress) पक्षातील कुणीतरी नानचे याला समोर करुन आपली हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप चंद्रकांत हंडोरे यांनी केलाय. याबाबत पक्षाने आणि सरकारने दखल घेऊन त्वरित चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी हंडोरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!