मुंबई : छोट्यापडद्यावरील ”तारक का उल्टा चश्मा” मालिकेतील (Taarak Mehta ka ulta chasma) ‘बबिता जी’ उर्फ मुनमुन दत्ता (Munmun Dutta) सोशल मीडियावर social media. नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असून तिच्या चाहत्यांशी संपर्कात असते. बबिता जी चा धमाकेदार डान्स करताना एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत असून ती पुन्हा चर्चेत आली आहे.
दरम्यान मुनमुन दत्ताने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुनमुन उर्फ ‘बबिता जी ‘पंघत पे मेनका नाचे’ या प्रसिद्ध गाण्यावर तिच्या किलर डान्सच्या अदा दाखवत आहे. तिने शॉर्ट वन पीस ड्रेस घातला असून मुनमुनच्या दिलखेच डान्स स्टेप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या फॅन फॉलोइंगची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
https://www.instagram.com/reel/CYbd0rigcz6/?utm_source=ig_web_copy_link
फिटनेसबाबत खूप सक्रिय असलेल्या अभिनेत्री मुनमुनचा जन्म २८ सप्टेंबर १९८७ रोजी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे झाला. २००४ मध्ये त्यांनी (ZeeTV) वरील ‘हम सब बाराती’ या मालिकेतून पदार्पण केले. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर मुनमुन दत्ताचा पहिला चित्रपट कमल हासनसोबत ‘मुंबई एक्सप्रेस’ (२००५) तसेच ‘हॉलिडे’ मध्ये दिसली होती. मात्र, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधूनच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा आता ‘या’ तारखेपासून होणार
- धोनीने पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला दिले गिफ्ट, ट्वीट व्हायरल
- ‘मनात दहशत करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी…’ चंद्रकांत पाटलांचे वक्तव्यं
- पाच राज्यातील निवडणूक; जाणून घ्या महत्वाचे १० मुद्दे
- किरीट सोमय्यांच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचे उत्तर; म्हणाले,‘सोमय्यांनी बोलताना भान…’

