Share

“जनतेला आज पश्चाताप होत असेल की, त्यांनी एका भित्र्या व्यक्तीला देशाचा नेता म्हणून निवडले”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षा त्रुटीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. यानंतर भाजप नेत्यांनी पंजाब सरकारवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. त्याअनुषंगानेच भाजप नेत्यांकडून पंतप्रधानांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी रुद्राभिषेक, आरती आणि महामृत्यूंजय मंत्रजाप देखील करण्यात आला. तर असे असतानाच कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील (Atul Londhe Patil) यांनी मात्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे.

‘आज देशातील जनतेला पश्चाताप होत असेल की, त्यांनी एका भित्र्या व्यक्तीला देशाचा नेता म्हणून निवडले.’ असे ट्वीट करत अतुल लोंढे पाटील यांनी मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

तर आता मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा थेट कोर्टातही गेला आहे. केंद्रीय गृहमंत्राल्याने पंजाब सरकारला मोदींच्या सुरक्षेत आलेल्या त्रुटीबाबत अहवाल मागितला आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी मोदींचा ताफा ज्या ठिकाणी अडकला तिथे न गोळीबार झाला, न धमकीचे उद्गार झाले. मग तरी मोदी प्राण वाचून परतले असे कसे म्हणत आहेत, असा विरोधाभास चन्नी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!