Share

‘काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज! तो बुडतच चालला आहे’

Published On: 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पानिपत झाले. या निवडणुकीच्या निकालानंतर धडे घेत काँग्रेस काही शिकून आपल्या पक्षात फेरबदल करण्यासठी पुढे सरसावेल असे वाटत होते. विशेष म्हणजे पक्षात असंतोष असताना मार्ग काढणे खूप गरजेचे असताना काँग्रेस पक्ष नेतृत्वाला अजून जाग येत नसल्यामुळे काँग्रेसचा पाय खोलात जाताना दिसत आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा असल्याचं म्हणत भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ‘काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा आहे. तो बुडतच चालला आहे. बुडणार तर आहेच तो कारण राहुल गांधींच्या परिवाराव्यतिरिक्त जर कोणी उठून दिसू लागला तर त्याला दाबून टाकलं जातं, त्याला बाजूला केलं जातं. म्हणून पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू, राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आणि समाजवादी पार्टी तर एकाच परिवारातल्या सदस्यांनी तयार झालेली आहे. अध्यक्षही त्याच परिवारातला आहे.’

प्रादेशिक पक्षामुळे काँग्रेसचे अस्तित्त्व धोक्यात
दक्षिणेकडील राज्यांतील निवडणुका संपलेल्या आहेत, आता उत्तरायण सुरू झाले आहे. उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये भाजपला काँग्रेसशी थेट लढत द्यावी लागेल.काँग्रेसने पक्षांतर्गत संघटनात्मक प्रश्न सोडवले, तर उत्तरेकडील राज्यांत काँग्रेसच भाजपसाठी अडचण उभी करू शकतो. ही बाब आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी चिंता वाढवणारी ठरेल. ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत, तिथे काँग्रेसला राजकीय स्थान नाही, हे पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत दिसून आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!