मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षात मोठी उलथापालथ सुरु आहे. त्यावरुन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे अनेकदा काँग्रेसवर भाष्य करताना दिसत आहेत. सकाळी अग्रलेखातून आणि आता माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर भाष्य केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्ष हेडलेस झाला आहे. त्याचा भाजप फायदा घेत आहे. त्यामुळे काँग्रेसने अध्यक्षपदाचा विषय मार्गी लावावा, असा सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.
जोपर्यंत काँग्रेस पक्षाला कोणी अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे तो थांबणार नाही असं माझ्यासारख्या राजकीय विश्लेषकाला वाटतं. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस हेडलेस, नेतृत्वहीन झाली आहे. त्याचा फायदा भाजप घेत आहे, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेस शिवाय राजकारण करता येणार नाही. पण काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला तर विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असंही राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय – अमोल कोल्हे
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- पेट्रोल-डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांना न परवडणारे; जाणून घ्या आजचे दर
- ‘शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा;त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

