🕒 1 min read
नवी दिल्ली : २०१४ नंतर केंद्रासह अनेक राज्यातील सत्ता काँग्रेसने गमावली. मात्र, २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथा पालथेनंतर महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेस सहभागी झाला. आता, काँग्रेसने पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) आदी राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेसने कंबर कसली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे राज्यातील राजकीय वजन कमी झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस हायकमांडच्या जवळचे नेते मानले जातात, त्यामुळे त्यांना कोणती महत्वाची जबाबदारी देऊन पुन्हा सक्रिय करून घेता येईल यासाठी चाचपण्या सुरु होत्या.
आसामच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाणांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवले आहे. त्यामुळे ते भाजपला कडवी टक्कर देणार का ? हे येत्या काळातच समजेल. विशेष म्हणजे ज्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस मधील संघठनावर नाराजी व्यक्त करत बदल करण्याची मागणी केली होती, त्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे.
INC COMMUNIQUE
Important Notification regarding constitution of Screening Committee in Assam pic.twitter.com/O24W00IrpQ
— INC Sandesh (@INCSandesh) March 1, 2021
आसामची निवडणूक कधी ?
आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करताहेत?’, पंकजा मुंडे संतापल्या
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- मनसेने ठोकले शाळेला टाळे
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- मोदींनी घेतलेली लस ही प्रसिद्धीसाठी तर पवारांनी घेतलेली लस ही आरोग्यासाठी – मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

