Share

‘अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करताहेत?’, पंकजा मुंडे संतापल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही काळापासून राज्यपालनाकडून केल्या जाणाऱ्या १२ आमदारांच्या नियुक्त्या होत नसल्याने मराठवाड्याचा विकासच काय संबंध असा सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे विधान दुर्दैवी आहे. असा हल्लाबोल माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्याच बरोबर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवत. वैधानिक विकास मंडळचा विषय काढत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.

त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? असा सवाल करत त्यांचा वर हल्ला चढवला.

आता पंकजा मुंडे यांनीही अजित पवारांना घेऱ्यात घेण्याचा प्रयत्न केला. “वैधानिक विकास महामंडळ किंवा मराठवाड्याचा विकास आणि 12 आमदारांच्या निवडीचा संबंध काय? असा थेट सवाल करत त्यांनी अजित पवारांचं वक्तव्य दुर्दैवी आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही. हे सरकार राजकीय सूडबुद्धीने काम करीत असल्याचे त्यांनी आरोप लावले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!