🕒 1 min read
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार, १ मार्च २०२१) सकाळी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतला. पंतप्रधानांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवर ही माहिती दिली. दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन कोरोना लस त्यांनी घेतली आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील लस घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय बनावटीची स्वदेशी कोवॅक्सिन लस घेतली तर शरद पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहयोगाने बनवलेली कोविशील्ड लस घेतली आहे.
कोरोना लस घेताना तोंडावर मास्क लावण्याची ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. ही लस आरोग्यासाठी आहे प्रसिद्धीसाठी नाही.
पवार साहेबांनी लस घेतली ती आरोग्यासाठी. pic.twitter.com/fYJ5q4k8o8— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 1, 2021
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेताना मास्क लावला नसल्याचे फोटो मधून दिसून येत आहे. मात्र, शरद पवार यांनी लस घेतानाही मास्क कायम ठेवल्याचे दिसून आले. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. ‘कोरोना लस घेताना तोंडावर मास्क लावण्याची ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. ही लस आरोग्यासाठी आहे प्रसिद्धीसाठी नाही. पवार साहेबांनी लस घेतली ती आरोग्यासाठी’ असं भाष्य अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- ‘युवकांनो, स्वच्छ राजकारणासाठी ‘वंचित’मध्ये सक्रि
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

