🕒 1 min read
औरंगाबाद : खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या हायस्कूल शाळेत अनेक वर्षापासून गणित या विषयाचा शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्यातरी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने मनसेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही दोन दिवसांपूर्वी निवेदन दिले होते त्यात शाळेला टाळे लावण्याचाही इशारा दिला होता. त्यानुसार मनसेने शाळेला टाळे ठोकले.
गेल्या दहा वर्षांपासून गणित विषयाला कायमस्वरूपी शिक्षक खंडाळा येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत नाही त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही महिन्यांपूर्वीच शाळा सुरु झाल्या आहे. मागील शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे मुलांना शाळेत जाता नहुते आले. त्यात आता गणित विषयाचे शिक्षक शाळेत नसल्यामुळे मुलांसह पालक देखील हवालदिल झाले आहे.
शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज मनसे ने आक्रमक पवित्रा घेत गणित विषयाचा कायमस्वरूपी शिक्षक शाळेस व मुलांना मिळावा अशी मागणी करत शाळेला कुलुप ठोकली आहेत. या वेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष नंदु हिरडे, रत्नाकर पवार, सुधाकर पवार, भागवत घोडेकर, बाळासाहेब जानराव, दिलीप जाधव, शिवाजी पैठणकर,सिताराम पानकर, कैलास वेळंजकर,प्रकाश आंबेकर,राजु आंबेकरआदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- ‘युवकांनो, स्वच्छ राजकारणासाठी ‘वंचित’मध्ये सक्रिय व्हा’
- महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना ‘एक लाख पत्र पाठवा’ आंदोलन


