Share

इंधन दरवाढीविरोधात जालन्यात काँग्रेसचा सायकल, बैलगाडी मोर्चा

Published On: 

🕒 1 min read

जालना : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस पुरता हतबल झालेला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवणे गरजेचे असताना केंद्र सरकार याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे याविरोधात जालना येथे काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली आणि बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

डिझेल आणि पेट्रोलच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचे परिणाम जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्यावर झाले आहे. इंधनाचे दर आटोक्यात ठेवले असते तर जीवनावश्यत वस्तूंचे दरदेखील स्थिर राहिले असते. परंतु केंद्रातील भाजप सरकार हे भांडवलदारांचे सरकार असून, सर्वसामान्य जनतेच्या अडचणींशी सरकारला काहीही घेणे देणे नाही.

या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी शहरातील हुतात्मा जनार्दन मामा यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून सायकल रॅली आंदोलनास जोरदार प्रारंभ करण्यात आला. रॅली महावीर चौक, सुभाष चौक, मुथा बिल्डिंग, लोखंडी पूल, मस्तगड या मार्गे जाऊन गांधी चमन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!