Share

‘अभिनंदन शिवराजजी, मध्यप्रदेशात अंधकारमय स्थिती असताना तुम्ही हा विक्रम केला आहे’; कॉंग्रेसचा टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर मध्य प्रदेशात भाजपाला सत्ता मिळाली.  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर २० पेक्षा अधिक आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आणि कमलनाथ सरकार कोसळलं. यानंतर पुन्हा एकदा भाजपा नेते शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

आता मुख्यमंत्रीपदी २५ दिवस झाले तर अद्याप एकाही आमदारानं मंत्रिपदाची शपथ न घेतल्यानं चौहान एकटेच सर्व राज्याचा कारभार पाहत आहे. काँग्रेससोडून भाजपात जाणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अमित शहांची भेट घेतली होती. काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेल्या आणि राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडलेल्या आपल्या समर्थकांना मंत्री करण्यात यावं, अशी मागणी सिंधिया यांची असल्याचं समजतं. परंतु यावर अद्याप तरी कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कॅबिनेटशिवाय २५ दिवस काम करत आहेत. गेल्या महिन्यात साधेपणानं चौहान यांचा शपथविधी संपन्न झाला. २३ मार्चला त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप तरी त्यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं नाही.

या आधी हा विक्रम कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावावर होता. त्यांनी कॅबिनेटशिवाय २४ दिवस राज्य कारभार केला होता. यावरून काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विवेक तनखा यांनी यावर भाष्य करणारं एक ट्विट केलं आहे. ‘

‘अभिनंदन शिवराजजी. मध्य प्रदेशात अंधकारमय स्थिती असताना तुम्ही कॅबिनेटशिवाय सर्वाधिकत दिवस मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नावे होता. तुम्हा दोघांना बंडखोरीमुळे चौथ्यांदा मुख्यमंत्री होता आलं, असा खोचक टोला तनखा यांनी लगावला आहे.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!