Share

‘शिवरायांचा अवमान करणारी ‘ही’ भाजपाची छिंदम प्रवृत्ती’, तात्काळ माफी मागा; कॉंग्रेसची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Mahara)केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूत्वाची व्होट बॅंक तयार केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावरूनच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाना साधत या वक्तव्याचा निषेध केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूत्वाची व्होट बॅंक तयार केली त्यावर कळस चढविण्याचे काम मोदींनी केले”असे तारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तोडले आहेत. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपाची छिंदम प्रवृत्ती आहे. व्होट बॅंकेच्या हिन राजकारणाशी शिवरायांचा संबंध जोडता? असा सवाल करणारे ट्वीट सचिन सावंत (Sachin Sawant)यांनी केले आहे.

शिवरायांची तुलना मोदींशी आदित्यनाथ व विजय गोयल यांनी केली होतीच. ‘आजके शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तक भाजपानेच काढले. भाजपा हे जाणिवपूर्वक करत आहे. शिवराय हे सद्विचारांचे प्रतिक आहेत व भाजपा कुविचारांचे, त्यामुळे तुलना पातकच आहे. तात्काळ माफी मागा. जाहीर निषेध. असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे. वर्षानुवर्ष मेहनत घेऊन विकसित केलेली जी रोपवे आहेत, ती संत-महंता पर्यंत पोहचते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहचते. त्यांनीही हिंदुत्वाची व्होट बॅंक तयार केली. त्यात अलीकडच्या काळामध्ये अटलजी, अडवाणी आणि मोदी यांनी कळस चढविला. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावरूनच त्यांनी मोदी आणि शिवराय यांची तुलना केल्याने आता वाद निर्माण होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!