🕒 1 min read
मुंबई:- २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.
संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी काँग्रेसने काहीशी मुत्सद्दी भूमिका घेतली होती. तर, गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे काँग्रेसमधील नाराजी सातत्याने उघड होतं आहे.
दरम्यान, काँग्रेसनं महाविकास आघाडीबरोबर जात शिवसेनेबरोबर युती केली तेव्हापासून काँग्रेसचं पतन होऊ लागले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे. ते मुंबईतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.
तसेच गेल्या दीड वर्षांपासून सर्व काही शांत होते, म्हणूनच मी काही तरी बोलायचो, परंतु भाई जगताप यांनी आता सुरुवात केली आहे. मी भाई जगताप यांच्यासोबत आहे. दिवसरात्र मेहनत करेन आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची बाजू भक्कम करेन, जर पक्ष जिवंत असेल तर आपण सर्व आहोत, असंही संजय निरुपमांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नागरिकांनी औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख करावा-सुभाष देसा
- हनीट्रॅप : ‘मुंडेंना मी ओळखतही नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा प्रश्नच नाही’
- ‘नमस्ते संभाजीनगर’चे बोर्ड काढले, भाजपचे निर्दश
- …म्हणून मांजरेकरांनी मारली ‘त्या’ व्यक्तीला चापट
- मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत आहे : राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
