मुंबई : बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला काल पाठीमागून धक्का दिला. मांजरेकर यांच्या गाडीला धक्का लागल्यानंतर त्यांचा संबंधित व्यक्तिसोबत वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. मांजरेकरांच्या गाडीला मारूती सुझुकी ब्रिझ्झा या गाडीने धडक दिली. याबाबत तक्रारदार व्यक्तिने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. कैलास सातपुते असं तक्रारदाराचं नाव आहे.
महेश मांजरेकर यांनी दारु पिऊन चापट मारली असं तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील तक्रारदार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा प्रसंग शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता पुणे – सोलापूर महामार्गावर घडला असल्याची माहिती आहे. आपल्या पुढे असलेल्या महेश मांजरेकर यांनी त्यांच्या कारला अचानक ब्रेक लावल्याने आपली कार त्यांच्या कारला पाठीमागून धडकली. त्यानंतर गाडीतून उतरुन महेश मांजरेकर यांनी तू दारु पिऊन गाडी चालवतोस का असं म्हणत आपल्याला चापट मारली असं तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं आहे.
याबाबत महेश मांजरेकर यांच्याशी एबीपी माझानं संपर्क केला असता ते म्हणाले की, माझ्या गाडीला मागून त्यांनी धडक दिली. त्या गाडीत तिघे होते. त्यापैकी दोघांनी मद्यप्राशन केल्याचं भासत होतं. मी त्यांना उतरून या धडकेबद्दल जाब विचारला. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करायची सोडून ते अरेरावीवर आले. मला चित्रिकरणाला उशीर होत होता म्हणून मी निघालो. या धडकेत माझ्या नव्या कोऱ्या मर्सिडीजचं नुकसान झालं आहेच. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल असेल तर हरकत नाही. पोलिसांनी बोलवलं तर मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन, असं महेश मांजरेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- नागरिकांनी औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख करावा-सुभाष देसा
- हनीट्रॅप : ‘मुंडेंना मी ओळखतही नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा प्रश्नच नाही’
- ‘नमस्ते संभाजीनगर’चे बोर्ड काढले, भाजपचे निर्दश
- कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर जर साईड इफेक्ट झाला तर चक्क कंपनी करणार नुकसान भरपाई !
- …तर दिल्लीपेक्षा मोठा भडका महाराष्ट्रात उडेल; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

