🕒 1 min read
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी शहराचे संभाजीनगर असे नामकरण केले आहे. त्यामुळे औरंगाबादचा शहरातील नागरिकांनी संभाजीनगर असाच उल्लेख केला पाहिजे असे आवाहन शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. नामांतराचा प्रशासकीयस्तरावर प्रस्ताव लवकरच मंजूर होईल असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
शहरात झपाट्याने विकास कामे होत असून, देशात गाजलेला कचरा प्रश्न आता मार्गी लागला आहे. एक हजार ६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा नारळ फुटला आहे. त्यामुळे लवकरच पाणीप्रश्न मार्गी लागेल. शहर स्मार्ट होत आहे. त्याला अधिक उंचीवर न्यायचे आहे. सुपर संभाजीनगर करायचे आहे, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी झाले. पडेगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सुपर संभाजीनगर करायचे असे सांगितले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- राज्य बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांबाबदल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सूचक विधान !
- रोहित शर्माच्या विकेटनंतर जोरदार टीका; रोहितने दिलं प्रत्युत्तर, म्हणाला…
- शेतक-यांना मन की बात नाही तर काम की बात पाहिजे- यशोमती ठाकूर
- पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींचे गुलाम; थोरातांची विखारी टीका
- कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर जर साईड इफेक्ट झाला तर चक्क कंपनी करणार नुकसान भरपाई !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
