मुंबई : महविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस पक्ष दुर्लक्षित होता. त्यात आता त्यांना नाना पटोले यांच्या सारखा आक्रमक नेता मिळाला आहे. पटोले यांनी आज काढलेली सायकल रॅली चांगलीच चर्चेत आहे. दुसरीकडे अधिवेशनाच्या आधीच आक्रमक झालेली भाजप पहिल्या दिवशीही आक्रमक भूमिकेमध्ये दिसून आली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असले तरी, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अधिवेशनाला वेगळाच रंग चढल्याचे दिसून येत आहे.
इंधन दर वाढीविरोधात आंदोलनाची सुरूवात काँग्रेस नेत्यांनी महत्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून केली. तर भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभागृहात प्रवेश केला. एकंदरीत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष विरोधी भूमिकेत दिसून आले.
नाना पटोले यांच्या सायकल रॅली वरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला चांगलंच घेरलं. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स ३२ रुपये आहे. राज्य सरकारनं २७ रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. नाना पटोले यांची सायकल रॅली हे केवळ एक मीडिया इव्हेंट आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. एकंदरीत हे चित्र पाहता काँग्रेसची धडपड नेमकी कशासाठी आहे, महाविकास आघाडीत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी की, केंद्रात भाजप विरोधी आक्रमक भूमिका घेण्यासाठी! असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- IPL सुरु होण्याआधी देव दर्शनाला पोहोचला धोनी
- 12 सदस्यांसाठी विदर्भ, मराठवाड्याला ओलिस धरलं; सभागृहात फडणवीस-अजितदादांत जुंपली
- संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी शिवसेनेतून ‘या’ आमदारांची नावे आहेत चर्चेत
- महागाईचा ताप; गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ
- नाना पटोलेंचे सायकल आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, फडणवीसांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

