Share

‘काँग्रेसने आणीबाणीतून सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली’

Published On: 

नवी दिल्ली : भाजप नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशात इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीच्या घटनेला ४६ वर्षे झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसवर टीका केली आहे. देशात २५ जून १९७५ रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी जवळपास २१ महिने म्हणजेच २१ मार्च १९७७ पर्यंत लागू होती.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा ट्विटमध्ये म्हटले आहे की, १९७५ च्या या दिवशी कॉंग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती.

ते म्हणाले, ‘असंख्य सत्याग्रह्यांना तुरूंगात टाकण्यात आले आणि प्रेस देखील बंद केले गेले. नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊन संसद आणि कोर्टाला निःशब्द प्रेक्षक बनविले. एका कुटुंबाच्या विरोधात उठणारा आवाज शांत करण्यासाठी लावण्यात आलेली आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा एक गडद अध्याय आहे. २१ महिने निर्दय शासनाचे क्रौर अत्याचार सहन करत देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्व देशवासियांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम.’

काँग्रेसकडून राजकीय स्वार्थासाठी आणीबाणी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं की, १९७५ मध्ये आजच्याच दिवशी काँग्रेसनं राजकीय स्वार्थासाठी आणीबाणीची घोषणा केली होती. भारताच्या महान लोकशाहीवरचा हा काळा डाग आहे. आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व महान लोकांना प्रणाम. अत्याचार सहन केला पण त्यांनी लोकशाहीची मूल्ये जपली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!