Share

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची ‘बी’ टीम; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

Published On: 

अकोले:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल केला.

दिल्लीमध्ये झालेल्या घटनेचा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रातील मोदी सरकावर टीकेची झोड उठवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

शेतकऱ्यांना पाठिंबा देणे आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणे ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची नौटंकी असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच हा कायदा मुळात काँग्रेसचाचं आहे. एका बाजूला केंद्राने तुमचाच कायदा आणला आहे. तुमचीच भूमिका केंद्र राबवत आहे. मग तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची बी टीम नाही का? असा प्रश्न विचारत आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!