Share

‘काँग्रेसचे आरोप खोटे, वैज्ञानिक तथ्यांच्या आधारेच दोन डोसमधील अंतर वाढवले’, केंद्राचे स्पष्टीकरण

Published On: 

नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमंधील अंतरावरुन निर्माण झालेल्या वादावर अखेर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांऐवजी १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय वैज्ञानिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारीत आहे

‘वैज्ञानिक आकडेवारीच्या आधारे #COVISHIELD च्या दोन डोसच्या दरम्यानचे अंतर वाढविण्याचा निर्णय पारदर्शक पद्धतीने घेण्यात आला आहे. डेटाचे मूल्यांकन करण्यासाठी भारताकडे एक मजबूत यंत्रणा आहे. दुर्दैवाने अशा महत्त्वाच्या विषयाचे राजकारण केले जात आहे’ असेही डॉ. हर्षवर्धन म्हणालेत.

तर दुसरीकडे National Technical Advisory Group on Immunization (NTAGI) च्या कोअर ग्रुपचे सदस्य असलेले एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. जयप्रकाश मुलीयील यांनीही सरकारच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण दिलेय. ते म्हणाले की, ‘यामध्ये कसलाही वाद नाहीये. लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णयावर आमच्या सर्वांचीच सहमती होती.’

आरोग्य मंत्रालयाने १३ मे रोजी कोव्हिशिल्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरुन १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी देशात लसींचा तुटवडा होता. मागणी इतका लसींचा पुरवठा होत नव्हता आणि देशभरात कोरोना संसर्गाचे प्रमाणही जास्त होते.

एन के अरोरा यांनी म्हटले आहे की, COVID-19 Working समितीच्या बैठकीत दोन डोसमधील अंतर वाढविण्यावरुन कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते. सर्व संमतीनेच हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने ट्विटमधून माहिती दिली आहे की, सरकारने समितीच्या शिफारशींचा स्वीकार करुनच मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. यात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाची लस कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!