Share

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादेत काँग्रेसचे आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन सुरु आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील या घटनेचा निषेध करीत जोरदार आंदोलन केेले. यावेळी युवक काँग्रेस आणि महिला आघाडीचाही आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये तीन कृषी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी शेतकरी बांधव आंदोलन करत होते. कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना त्याठिकाणी घडली. यात चार शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे तिकोना भवानीपूर दौऱ्यावर असताना ही घटना घडली. त्यानंतर बिगर भाजपाशासित राज्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर विरोधकांनी या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या निषेधार्थ सोमवारी क्रांती चौक येथे काळी पट्टी बांधुन दोन तास ठिय्या देण्यात आल्या.

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील या घटनेचा निषेध करीत जोरदार आंदोलन केेले. लखीमपूर गावामध्ये झालेल्या शेतकरी हत्या झालेल्या पिडीत कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असतांना प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारचा औरंगाबाद काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रकाश मुगदिया, अनिल पटेल, मुजफ्फर खान पठान आदि उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!