Share

आक्रोश मोर्चा : मराठा आंदोलकांना रोखलं; मोजक्या आंदोलकांना बसने मुंबईला पाठवणार!

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : नऊ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली; त्यामुळे ज्यांची नोकरी व शैक्षणिक प्रवेश अडचणीत सापडले, त्या युवकांमध्ये प्रचंड नैराश्य आले. तसेच हजारो मराठा विद्यार्थी-उमेदवार आत्महत्येच्या काठावर उभे आहेत. म्हणूनच या स्थगितीचा अन्वयार्थ लावणे आणि विविध पर्याय देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आता मराठा समाज कमालीचा आक्रमक झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूरमध्ये हजारो मराठा आंदोलक जमा झाले असून त्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेतले. पंढरपुरात वातावरण तापलं असल्याने राज्य परिवहन महामंडळाची बससेवा देखील बंद ठेवण्यात आला आहे. तर, वातावरण अधिक चिघळू नये यासाठी मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. पंढरपुरात जमावबंदी लागू केल्यानंतरही मराठा आंदोलकांनी त्या आदेशाची होळी करत आंदोलनावर ठाम भूमिका घेतली.

नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या आंदोलकांना रोखलं आहे. सुरुवातीला आंदोलकांना रोखल्यास आक्रमक इशारा या मोर्चाच्या आयोजकांकडून देण्यात आला होता. मात्र, आता इंदिरा चौकातून बसने पन्नास आंदोलक प्रतिनिधी मुंबईला रवाना होणार आहेत.

राज्यात पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हे आंदोलक प्रतिनिधी मुख्य सचिवांकडे निवेदन देणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!