🕒 1 min read
नवी दिल्ली- मुंबई -जम्मू काश्मीरमधील स्थानबद्ध केलेल्या सर्व राजकीय नेत्यांची सुटका सरकराने केली आहे. एका बाजूला कलम ३७० हटविल्याने जनता स्वागत करत आहे तर दुसऱ्या बाजूला जनतेची माथी भडकविण्याचे काम काही नेते करत आहेत.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी कलम ३७० पुन्हा लागू करण्यावर भाष्य केले असून पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला यांनी म्हणाले कि, “मी आपल्या लोकांना अधिकार पुन्हा मिळवून दिल्याशिवाय मरणार नाही. मी या ठिकाणी लोकांचं काम करण्यासाठी आलो आहे. ज्या दिवशी माझं काम पूर्ण होईल त्या दिवशी मी या ठिकाणाहून निघून जाईन,” असंही अब्दुल्ला म्हणाले.
अब्दुल्ला म्हणाले, जे लोक आम्हाला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आम्हाला पाकिस्तानात जायचे असते तर १९४७ मध्येच गेलो असतो.परंतु, हा आमचा भारत आहे. महात्मा गांधी यांचा भारत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आक्रोश मोर्चा : मराठा आंदोलकांना रोखलं; मोजक्या आंदोलकांना बसने मुंबईला पाठवणार!
- ‘मी निवृत्त झाले’ म्हणून धक्का देणारी पी. व्ही. सिंधू एशियन स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज !
- कांद्याचे भाव स्थिरच, आता पुन्हा आवक घटली!
- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला प्रवक्त्यांना ‘हा’ कानमंत्र
- मंदिरे उघडलीच पाहिजे अशाप्रकारचा हट्ट का? हेमंत टकले यांचा भाजपला सवाल


