मुंबई- मुंबई -जम्मू काश्मीरमधील स्थानबद्ध केलेल्या सर्व राजकीय नेत्यांची सुटका सरकराने केली आहे. एका बाजूला कलम ३७० हटविल्याने जनता स्वागत करत आहे तर दुसऱ्या बाजूला जनतेची माथी भडकविण्याचे काम काही नेते करत आहेत.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी कलम ३७० पुन्हा लागू करण्यावर भाष्य केले असून पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला यांनी म्हणाले कि, “मी आपल्या लोकांना अधिकार पुन्हा मिळवून दिल्याशिवाय मरणार नाही. मी या ठिकाणी लोकांचं काम करण्यासाठी आलो आहे. ज्या दिवशी माझं काम पूर्ण होईल त्या दिवशी मी या ठिकाणाहून निघून जाईन,” असंही अब्दुल्ला म्हणाले.
अब्दुल्ला म्हणाले, जे लोक आम्हाला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आम्हाला पाकिस्तानात जायचे असते तर १९४७ मध्येच गेलो असतो.परंतु, हा आमचा भारत आहे. महात्मा गांधी यांचा भारत आहे.
If Farooq Abdullah wants, he can go to Pakistan and implement Article 370 there. In India, there is no place for Article 370 and 35 A: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/gEoCmAvBhI
— ANI (@ANI) November 7, 2020
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.संजय राऊत म्हणाले कि, आता देशातील कोणतीही शक्ती काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० आणू शकणार नाही. फारुख अब्दुल्ला यांना पाकिस्तानमध्ये जाऊन ३७० कलम लागू करायचेय का, हे विचारले पाहिजे. तसेच कलम ३७० रद्द झाल्यामुळे देशाच्या इतर भागातील उद्योजकांना काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काश्मीरमध्ये उद्योग क्षेत्राला गती येईल. येथील लोकांना रोजगार मिळतील, असे देखील मत राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आक्रोश मोर्चा : मराठा आंदोलकांना रोखलं; मोजक्या आंदोलकांना बसने मुंबईला पाठवणार!
- ‘मी निवृत्त झाले’ म्हणून धक्का देणारी पी. व्ही. सिंधू एशियन स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज !
- कलम ३७० पुन्हा लागू होईपर्यंत मरणार नाही : फारूख अब्दुल्ला
- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला प्रवक्त्यांना ‘हा’ कानमंत्र
- मंदिरे उघडलीच पाहिजे अशाप्रकारचा हट्ट का? हेमंत टकले यांचा भाजपला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

