🕒 1 min read
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून जाहीरपणे मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांच्याच पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची अडचण होतेय, कुचंबणा होतेय. पण पुण्याचे मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली भावना स्पष्टपणे व्यक्त करून लोकशाहीला साजेसं काम केलं आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मनसेचे पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांचं फेसबुक पोस्टवरून अभिनंदन केले आहे, म्हणाले, “लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी कोणत्याही एका जातीचा, धर्माचा, वर्गाचा किंवा परिवाराचा नसून तो संपूर्ण समाजाचा असतो. भलेही त्याला निवडून देणाऱ्या मतदारांमध्ये एखाद्या विशिष्ट समुदायाचं योगदान जास्त असेल, पण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर त्या वार्डातील किंवा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून त्याने काम करणं अपेक्षित असतं. जातीवरून, धर्मावरून अथवा इतर कोणत्याही मुद्यावरून कोणताही भेदभाव करणं अथवा द्वेष, भीती निर्माण होईल अशा कोणत्याही गोष्टीला त्याने थारा द्यायचा नसतो. लोकशाहीतील या खूप महत्त्वाच्या मूल्याला वसंत मोरे जागले असल्यामुळे मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. असं फेसबुक पोस्टवरून म्हणाले.
सत्यजित तांबे पुढे म्हणाले, वसंत मोरे यांनी आणखी एक खूप महत्त्वाचा आदर्श आपल्या कृतीतून घालून दिला आहे. एखादी भूमिका जरी आपल्या पक्षाची, पक्ष नेतृत्वाची असेल आणि ती आपल्याला पटत नसेल, आपल्या विचारसरणीशी विसंगत असेल, लोकशाही व संविधानाच्या मूल्यांशी विसंगत असेल तर त्याला नक्कीच विरोध केला पाहिजे. वसंत मोरे यांच्या या कृतीतून खूप काही शिकण्यासारखे आहे.
कारण, चुकीच्या गोष्टींना चूक म्हणण्यासाठी खूप मोठे वैचारिक, नैतिक धैर्य असावे लागते. माझे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, त्यांनी देखील अशा पद्धतीने पुढे येऊन लोकशाही बळकट करण्यासाठी आपली भूमिका मांडली पाहिजे. हेच सजग नागरिक आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचेही सत्यजित तांबे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
“राऊतांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”; सोमय्यांचे आव्हान
IPL 2022: कार्तिक नावाचे वादळ अजूनही घोंगावते; ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर म्हणाला ‘अजून संपलेलो नाही…!’
“जे होईल ते कायद्यानेच तुम्ही खंबीरपणे…”, भातखळकरांचा रोहित पवारांना टोला
“…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे”, भातखळकरांचा राऊतांना टोला
“ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…” मनसेने राऊतांना डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
