Share

पुण्यात कॉंग्रेसच्या उमेदवारीत गोंधळ; घोषणा नसतानाही अरविंद शिंदेंची प्रचाराला सुरुवात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – पुण्यात भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देऊन बापट यांनी प्रचाराला सुरुवातही केलीय. मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचा सुरु असलेला घोळ अजुन संपलेला नाही. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव काँग्रेसने निश्चित केलं आहे. पण त्याच्या नावाची अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही. पण तरीही शिंदे यांनी गुरुवारपासून प्रचाराला सुरुवातही केली आहे.

गेली काही दिवस काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू होती. दिल्लीतल्या श्रेष्ठींनी आपलं मत शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांची उमेदवारी पक्की झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीतून दोन निरिक्षक पाठवून काँग्रेसने अंतर्गत सर्व्हेही केला होता. त्यानंतर अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रवीण गायकवाड या तिघांची नावे दिल्लीत पाठविण्यात आली होती. यातून अरविंद शिंदे यांचं नाव निश्चित झालं. घोषणा अजुन होत नसली तरी स्वयंघोषीत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलीय.

लोकांच्या भेटीगाठी घेण आणि मान्यवरांना भेटणं अरविंद शिंदे यांनी सुरू केलंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची शिंदे यांनी भेट घेतली आणि चर्चा केली. आपल्यालाच उमेदवारी मिळेल याची त्यांना पूर्ण खात्री आहे. तर दुसरे इच्छुक उमेदवार मोहन जोशी हेही प्रचाराला लागणार आहेत. त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर तिसरे उमेदवार प्रविण गायकवाड यांनी काँग्रेसच्या घोळाला कंटाळून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!