नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक इयत्ता 11 वी व 12 वीच्या विषय शिक्षकांसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या परीक्षेसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे. हे प्रशिक्षण घेणे सर्व संबंधित शिक्षकांना अनिवार्य केले आहे.
या प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविदयालयातील सर्व विषय शिक्षकांची ऑनलाईन नाव नोंदणी करुन घेण्यात येत आहे. उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी प्रशिक्षणास सहभागी होण्यासाठी मंडळाच्या evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या विहित प्रपत्रात/ फार्म मध्ये आपली माहिती 28 मार्च 2021 पर्यंत भरणे गरजेची आहे. त्यानंतर लगेच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी इयत्ता बारावी मुल्यमापन आराखडा व तद्नुषंगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विहित मुदतीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
आरोग्य आणि शारीरीक शिक्षण, चित्रकला, संकल्पचित्र व रंगकाम, चित्रात्मक संकल्प, कलेचा इतिहास व रसग्रहण, भारतीय संगीताचा इतिहास व विकास, कंठ सुगम संगीत, संठ शास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, तालवाद्य या विषयांच्या विषय शिक्षकांसाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शिक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

