Share

Rohit Patil | “कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, सत्तारुढ पक्षांनी…” ; रोहित पाटील आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

Rohit Patil | मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाने उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे तणावाच्या भीतीने महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केला. यावर महाराष्ट्रातील विरोधीनेते आक्रमक झाले आहेत. रोहित पाटील यांनी सत्तारुढ पक्षावर ताशेरे ओढले आहेत.

रोहित पाटील म्हणाले, “मराठी भाषक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.! महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभीमानावर हल्ला आहे. अशा हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. महाराष्ट्र सरकारनं याबाबत कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी ,अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजुटीनं सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागे ठाम उभे आहेत.”

“सत्तारुढ पक्षांनी देखील आपलं कर्तव्य पार पाडावं. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजुट दाखवण्याची हीच वेळ आहे,” असे रोहित पाटील म्हणाले.

 

संजय राऊत यांचा घणाघात –

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुर्चीवर बसून महाराष्ट्राचा अपमान पाहत आहेत. महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल. मंत्री डरपोक आहेत.ते कर्नाटकात कधी जातात, याची आम्ही वाट पाहत आहोत.”

“हे डरपोक लोक आहेत. मंत्र्यांचे काय घेऊन बसला आहात. कर्नाटकातून यांना खलिता आला येऊ नका. यांची हातभर फाटली. यांनी जायला पाहीजे होतं. मंत्र्यांनी धाडसाने जायला पाहीजे होतं. कसला कायदा-बियदा सांगत आहात. आमच्या गाड्या फोडल्या ते कायद्यात बसते का?, बेळगाव-कारवार हा महाराष्ट्राचा भाग आहे. आमच्या बापाचा आहे,” असे राऊत म्हणाले.

जितेंद्र आव्हाड आक्रमक –

जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला षंढ समजू नका. आम्ही काय बांगड्या भरल्या का?. तुम्ही आमच्या बस फोडल्या तर आम्ही तुमच्या बस फोडू शकत नाही, असे तुम्ही समजत आहात का? मराठी माणूस शांत बसला आहे. तर आम्ही बांगड्या भरल्या, असे समजू नका. या भूमिवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, एवढे ध्यानात ठेवा. मराठी माणूस कर्नाटकात कमी आहे. मात्र मुंबईमध्ये कन्नड जास्त आहेत. बंगळुरु पेक्षा जास्त कर्नाटकी मुंबईमध्ये राहतात.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!