🕒 1 min read
Eknath Shinde | मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत माहिती दिली असून प्रतिक्रिया देखील दिली आहे.
यावेळी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. मुंबई महापालिकेतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित छायाचित्र प्रदर्शनास यावेळी भेट दिली. तसेच चैत्यभूमीवर तेवत असलेल्या भिमज्योतीचे दर्शन घेतलं असल्याचं शिंदे म्हणाले.
माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील व्यक्ती सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसली हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच शक्य झाले असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. बहुजनांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. दादर येथील इंदू मिलच्या जागेत अतिभव्य असे स्मारक उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून हे सरकार ते नक्की पूर्ण करेल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच समाजातील तरुणांना शासकीय वसतिगृह, बार्टीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधा, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, स्टॅण्ड अप इंडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती यात नक्की वाढ करण्यात येईल असेही याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले, असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे आणि लोकराज्यच्या विशेषांकाचे यासमयी प्रकाशन करण्यात आले, असल्याचं शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “हे उकसवायचं काम…”, कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या दगडफेकीवर एकनाथ शिंदे गटाची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | “केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी तुमची सत्ता, मास्टरमाईंड कोण?” ; कर्नाटकप्रश्नी अजित पवारांचा सवाल
- Ajit Pawar | “महाविकास आघाडी समविचारी पक्षांना सोबत घेण्यास तयार”, अजित पवार स्पष्ट बोलले
- Akshay Kumar | अक्षय कुमार आगामी चित्रपटातून देणार लैंगिक शिक्षणाने धडे
- Shambhuraj Desai | “वास्तविक आम्हाला कर्नाटकला जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, मात्र…” ; शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
